सिरोंचा, प्रतिनिधी ,
सिरोंचा : तालुक्यातील लांबडपल्ली येथील निखिल कुमार उपला यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील करीमनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज यांनी संवेदनशीलता दाखवत तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.निखिल कुमार लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने रोजंदारीच्या कामातून मुलाचा सांभाळ करत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर निखिलच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यावर सध्या करीमनगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.निखिलच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती कार्यकर्त्यांमार्फत राजे अंबरीशराव महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी कोणताही विलंब न करता निखिलच्या उपचारासाठी आर्थिक मदत पोहोचवली. त्यांच्या या तत्पर मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.या मदतीबद्दल निखिलच्या आईने राजे अंबरीशराव महाराज यांचे मनःपूर्वक आभार मानले. गरजू कुटुंबाच्या अडचणीच्या काळात तातडीने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल परिसरातूनही त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.निखिल कुमार लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन घरी परतावेत, यासाठी सर्वांकडून प्रार्थना व्यक्त केली जात आहे.







