प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : श्रावण मासानिमित्त कन्यका मंदिर ट्रस्ट सिरोंचा कमिटीच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिनाभर रुद्राभिषेकाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.श्रावण मासाच्या सांगतेनिमित्त कन्यका मंदिर परिसरात सामूहिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्यका मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष ओमप्रकाशजी ताटीकोंडावार यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रस्टचे सदस्य तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विधिवत पूजा-अर्चना केली.पूजेच्या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी श्रद्धेने सत्यनारायण पूजेत सहभाग घेतला. धार्मिक विधी व पूजेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ट्रस्ट कमिटीच्या वतीने धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.







