पत्रकारांच्या समस्या, आगामी कामकाज व पत्रकार दिनाच्या पुरस्कार सोहळ्याबाबत चर्चा
सिरोंचा : सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेची मासिक बैठक गुरुवारी, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. बैठकीला तालुक्यातील विविध पत्रकारांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान पत्रकार संघटनेच्या आगामी कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि पत्रकारांच्या हिताच्या विषयांवरही चर्चा करून त्याबाबत पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी आगामी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली. पत्रकारिता क्षेत्रात विविध समस्या बाबत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन २०२६ वर्षाचे कार्याबद्दल पुरस्कार व सन्मान करून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन येत्या महिन्यांत करण्यात येणार असून, पुरस्कार सोहळा योग्य पद्धतीने आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर मुलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोणी, सचिव अशोक कुम्मरी, ज्येष्ठ व मार्गदर्शक नागभूषण चकिनारापूवार, पत्रकार श्याम बेज्जनिवार, जाकीर अली, देवेंद्र रंगू, सुधाकर सिडाम, छोटू खान, रविकुमार मल्लमपल्लीवार, महेश आगूला आदी उपस्थित होते.
बैठकीच्या माध्यमातून पत्रकार संघटनेच्या आगामी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.







