प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : धर्मापुरी–सिरोंचा मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तन्वी MRF टायर शो-रूमचा भव्य शुभारंभ सिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.ग्राहकांना दर्जेदार टायर तसेच वाहनांसाठी आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शो-रूमची सुरुवात करण्यात आली आहे. सिरोंचा शहरासह परिसरातील वाहनधारकांसाठी हे शो-रूम सोयीचे ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.शुभारंभ प्रसंगी सुभाष व्यास,कम्बगौनी राजबाबू,नगरसेवक सतीश बोगे, नगर सेवक नरेश अलोने,शिवाजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते रवी बोंगोनी, मारुती भाऊ गणपुरापू,शंकर तडकापल्ली,कुंदरपू गट्टू,सागर कांबागोनी नागेश जन्नम,येल्लेश बानाला,रामकृष्णा नडीगोटा यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी तन्वी MRF टायर शो-रूमच्या संचालकांना शुभेच्छा देत व्यवसायाच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







