प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा, दि. ८ सप्टेंबर : नाभिक समाजाचे आराध्य दैवत व संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका नाभिक समाज संघटना, सिरोंचा यांच्या वतीने मंगळवारी दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वॉर्ड क्रमांक ०५, सिरोंचा येथे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या महान विचारांचे स्मरण केले.
“भक्ती, सेवा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक एकता” हा संत सेना महाराजांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांनी आपल्या आचरणातून समाजाला कर्तव्यनिष्ठेचा आणि समतेचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने संत सेना महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, सामाजिक एकता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
उपस्थित समाजबांधवांनी संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच संत सेना महाराजांचे विचार आणि शिकवण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमाचे , तालुका नाभिक समाज संघटनेचे **अध्यक्ष श्री.सतीश पोचम दागम उपाध्यक्ष श्री चंद्रमौली दागम सचिव श्री.सतीश नानय्या दागम **यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







