सागर मूलकला , प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा : नगर पंचायत सिरोंचा येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश भोगे व नगरसेवीकांनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राहुल राऊत यांना राखी बांधून साजरा केला आहे,नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश भोगे,नगर सेविका सपना तोकला, पद्मा पिल्लीवार व नुसरत शेख यांनी पुढाकार घेत मुख्याधिकारी राहुल राऊत, नगर पंचायतच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घोडे व इतर कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. नगर पंचायतमध्येही या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.या उपक्रमामुळे नगर पंचायत परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.







