ST Boy’s संघ उपविजेता ; पेटीपाका संघाला तृतीय क्रमांक ..!
प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.मा. एम. रमेश सो, पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. गोकुळ राज सो, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली, मा. कार्तिक मधिरा सो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली तसेच मा. हर्षवर्धन सो, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या संकल्पनेतून आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ आणि पोलीस अंमलदारानी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेतील अंतिम सामन्यांमध्ये सिरोंचा ठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले, तर ST Boy’s संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. पेटीपाका संघाने तृतीय क्रमांक पटकावला.विजेत्या सिरोंचा ठाणे संघाला ₹३,०००, उपविजेत्या ST Boy’s संघाला ₹२,०००, तर तृतीय क्रमांकाच्या पेटीपाका संघाला ₹१,००० रोख पारितोषिकासह बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावना वाढीस लागण्यास मदत झाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पोलीस विभागाचे परिसरातील नागरिक व क्रीडाप्रेमींनी कौतुक केले.







