नगरसेविका शेख नुसरत बाबर यांचे मुख्याधिकारी राहुल राऊत यांना निवेदन
प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : महिलांच्या व मुलींच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि जनजागृतीसाठी उपलब्ध निधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर करावा, अशी मागणी सिरोंचा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका शेख नुसरत बाबर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल राऊत यांना देण्यात आले.निवेदनात महिलांसाठी आवश्यक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिला व मुलींसाठी First-Aid Kits, मूलभूत आरोग्य साहित्य, Sanitary Pad Vending Machine, Sanitary Pad Incinerator/Disposal व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा तसेच सुरक्षित पिण्याचे पाणी व Water Filter/Purifier उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.शाळा व अंगणवाडी परिसरात आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमांसाठी Rechargeable Speaker with Microphone उपलब्ध करून देणे, तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील सूर्यापल्ली येथील व इतर ठिकाणच्या जीर्ण झालेल्या अंगणवाडी केंद्रांचे पुनर्स्थापन/पुनर्विकरण करण्याची मागणीही करण्यात आली.महिलांच्या आरोग्यासाठी Women’s Gym सुरू करण्यासह महिला व मुलींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन निधीचा योग्य व पारदर्शक पद्धतीने वापर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी नगरसेविका महेश्वरी पेदापल्ली, सपना तोकला आणि पद्मा पिल्लीवार उपस्थित होत्या. महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी मांडलेल्या मागण्यांवर मुख्याधिकारी राहुल राऊत यांनी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.







