चामोर्शी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीच्या सभापतीपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून, विविध ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत बाजार समितीच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ व योग्य दर मिळवून देण्यासाठी तसेच बाजार समितीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या सभापतीपदी झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







