नडिकुडा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक ठरले जिल्ह्याचा गौरव
प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, नडिकुडा येथील मुख्याध्यापक मा. श्री. समय्या सद्दी यांची गडचिरोली जिल्ह्यातील गुणगौरव शिक्षक पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, प्रामाणिक सेवा आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी घेतलेली मेहनत याची दखल घेत त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.मुख्याध्यापक समय्या सद्दी यांच्या कर्तृत्वामुळे नडिकुडा केंद्र शाळेचे, विद्यार्थ्यांचे तसेच संपूर्ण परिसराचे नाव गडचिरोली जिल्ह्यात उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







