प्रतिनिधी – सागर मूलकला
गडचिरोली :विदर्भ बेलदार समाज तत्सम जमाती संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने २२ वे राज्यस्तरीय अधिवेशन तसेच उपवर–वधू परिचय मेळावा येत्या रविवारी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.या महत्त्वपूर्ण मेळाव्यात सिरोंचा तालुक्यातील बेलदार, मुन्नूरकापू, कापेवार, तेलंगा व तत्सम जमाती समाजातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कापेवर समाजाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांनी आहवन केली आहे,या अधिवेशनाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मरावबाबा आत्राम हे राहणार आहेत. तसेच तेलंगणा राज्याचे माजी आमदार पूट्टा मधूजी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासावर मार्गदर्शन, समाजातील प्रश्नांवर चर्चा तसेच युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.







