* सिरोंचा (प्रतिनिधी) – इंजिनिअर मयूर पुप्पालवार यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन आज दिनांक ११ जानेवारी रोजी राज राजेश्वरी फॅशन हॉल येथे उत्साहात पार पडले. या मंगल प्रसंगी सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतीश बोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार, कार्यकर्ते शंकर बंदेला तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस मंगलकामना व्यक्त केल्या. विवाह सोहळा आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







