राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्याहस्ते उद्घाटन…!
सिरोंचा : तेलंगणा राज्यातील नंदी मेडाराम येथे दर दोन वर्षांनी भरविण्यात येणाऱ्या विश्वप्रसिद्ध सामक्का–सारक्का महाकुंभ यात्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील भाविकांच्या सोयीसाठी भूपालपल्ली RTC बस डेपोकडून तब्बल ३० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डेपो इन्चार्ज पी. के. मूर्ती यांनी दिली आहे.ही विशेष बस सेवा दि. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. या बस सेवेचे उद्घाटन आज दि. २६ जानेवारी रोजी भूपालपल्ली RTC डेपो मॅनेजर हिंदू मॅडम यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचाचे शहराध्यक्ष रवीजी सुलतान तसेच शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तेलंगणा सरकारने भूपालपल्ली RTC बस डेपोच्या माध्यमातून यात्रेसाठी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील भाविकांमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी बोलताना डेपो मॅनेजर हिंदू मॅडम यांनी प्रवाशांनी RTC बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. RTC बस प्रवास हा सुरक्षित, सोयीस्कर व विश्वासार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.महाकुंभ यात्रेसाठी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुरक्षित प्रवासाची हमी मिळाल्याने यात्रेचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यावेळी नारायण मूडीमडीगेला, नंदू मोरला, बस चालक, वाहक उपस्थित होते,







