भगवंतराव कला महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरी…..
सिरोंचा/अशोक कुम्मरी
सिरोंचा येथील भगवंतराव कला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भोयर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भोयर सर तसेच मा. प्रकाश लाढे (समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व सांगत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांवर आधारित मोलाचे मार्गदर्शन केले. युवकांनी ध्येय निश्चित करून आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक भान जपत कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रभावी संचालन डॉ. उरकुडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जक्कू सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.







