प्रतिनिधी – सागर मूलकला
(ता. सिरोंचा) : सिरोंचा मुख्यालय येथे सिरोंचा पत्रकार संघटनेच्या वतीने 12 जानेवारी रोजी थोर भारतीय संन्यासी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मुलकला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर, त्यांचे राष्ट्र उभारणीसाठीचे विचार, युवकांप्रती असलेली दृष्टी आणि भारतीय संस्कृतीवरील त्यांचे योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.संघटनेचे अध्यक्ष सागर मुलकला यांनी बोलत स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे सांगितले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा संदेश युवकांसह पत्रकारांसाठीही प्रेरणादायी असून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी पत्रकारांनी प्रामाणिक, निर्भीड आणि जबाबदार भूमिका बजावावी, असे त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थित वक्त्यांनी युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. तसेच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास सिरोंचा पत्रकार संघटनेचे स्थानिक पत्रकार श्याम बेज्जनवार,सुधाकर सिडाम, याची उपस्थित होते.







