सागर मूलकला/ प्रतिनिधी सिरोंचा
गडचिरोली :बेलदार मुन्नूरकापू कापेवार तेलंगतत्सम जमाती समाज बहुउद्देशीय मंडळ, चंद्रपूर अंतर्गत विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने आयोजित २२वा कापेवार बेलदार समाज मेळावा रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा सकाळी १० ते रात्री १ वाजेपर्यंत प्रसन्ना सेलिब्रेशन हॉल, नवेगाव–चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे संपन्न झाला.राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन वामनराव कासावार (माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र) यांच्यासह समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मेळाव्याच्या सायंकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सामूहिक नृत्य एकल नृत्य (अ गट : वय ५ ते १२)एकल नृत्य (ब गट : वय १३ ते २०)एकल नृत्य (क गट : वय २१ व त्यावरील)पारंपरिक बतकम्मा नृत्य स्पर्धा अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या मेळाव्यात समाजाच्या महिला चमूने सादर केलेल्या कला व नाट्य प्रदर्शनात कापेवर समाजाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा तालुक्यातील महिलेनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.या भव्य समाज मेळाव्यासाठी जिल्हाभरातून समाजातील पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. मेळाव्यामुळे समाजातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासह नव्या पिढीला व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.







