सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा :खेळ, उत्साह आणि आठवणींचा संगम असलेला नगराध्यक्ष चषक सिझन–1 लेजेंड क्रिकेट टुर्नामेंट 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शानदार वातावरणात संपन्न झाला. 18 ते 26 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेने सिरोंचातील क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा जुन्या सुवर्णकाळाची अनुभूती दिली.दररोज रंगणाऱ्या सामन्यांत खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, अनुभव आणि खेळभावना पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. या स्पर्धेत पाशा किंग्स 11 संघाने विजेतेपद पटकावले, तर R.K. CC संघ उपविजेता ठरला.पारितोषिकांची बरसातविजेत्या संघाला ₹50,001/- चे प्रथम पारितोषिक सिरोंचा नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या तर्फे देण्यात आले.उपविजेत्या संघाला ₹30,001/- चे द्वितीय पारितोषिक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या तर्फे प्रदान करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक आकर्षक बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.🎤 मान्यवरांची उपस्थितीबक्षीस वितरण सोहळ्यास News 18 मराठीचे प्रतिनिधी महेशभाऊ तिवारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर कोलूरी, फाझील भाई, नगरसेवक-नगरसेविका व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान पत्रकार महेशभाऊ तिवारी यांनी एफसीडी मैदानावर पूर्वी झालेल्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावूक केले.👏 यशामागची टीमया टुर्नामेंटच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष फाझील भाई व उपाध्यक्ष वेंकट कामगटी यांनी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. आयोजक दिलीप शेनिघारपू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी, सदस्य, पंच व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.शेवटी उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी आयोजक, खेळाडू, पंच, स्वयंसेवक व सर्व क्रिकेटप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील सिझन अधिक भव्य करण्याचा मानस व्यक्त केला.







