सागर मूलकला, संपादक
सिरोंचा | विशेष प्रतिनिधी
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोडणाऱ्या कोप्पेला, रमेशगुडम व कोर्ला या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे या मार्गावरील एसटी बससेवाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बंद केली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य व दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)चे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी पुढाकार घेत आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती केली. कोप्पेला–रमेशगुडम–कोर्ला मार्गावर ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने मुरूम टाकून वाहून गेलेला रस्ता व खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे सदर मार्ग सध्या वाहतुकीस योग्य झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
🚍 एसटी बससेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिरोंचा–कोर्ला मार्गे झिंगानूरकडे जाणारी एसटी बस अनेक वर्षांपासून बंद होती. या संदर्भात बानय्या जनगाम यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार आत्राम यांच्या निर्देशानुसार अहेरी आगारातून बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेचे कारण देत एसटी महामंडळाने बस पुन्हा बंद केली. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला होता.
🤝 सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक
केवळ रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी बानय्या जनगाम यांनी स्वखर्चाने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या कार्यामुळे कोर्ला व कोप्पेला परिसरातील नागरिकांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
👥 उपस्थित मान्यवर
यावेळी राकाँ (अ.प.) कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,
सरपंच लक्ष्मण गावडे, सरपंच सूरज गावडे, सरपंच सुरेश जनगाम,
कौशल्या आत्राम, सरपंच सुशीला वेलादी, उपसरपंच शेखर गणपूरपू,
माजी सरपंच बोडका गावडे, भारत मडावी,
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख तिरुपती चिट्याला,
लक्ष्मण गावडे, निलेश सडमेक, श्रीनिवास चेडे, अशोक मडावी,
गोपाल सडमेक, नारायण तलंडी, आनंदाराव नीलम, दुर्गेश लंबाडी,
बाबुराव कुम्मरी, श्रीनिवास कुम्मरी यांच्यासह
कोर्ला परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







