प्रतिनिधी / सागर मूलकला. सिरोंचा
सिरोंचा : मौजा पेंटिपाका (WL), ता. सिरोंचा, जि. गडचिरोली येथे बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. श्रीनिवास मूलकला यांच्या शेतावर पट्टा पद्धतीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पट्टा पद्धतीने धान लागवडीचे फायदे व महत्त्व समजावून सांगण्यात आले. या पद्धतीमुळे धान पिकाची योग्य पद्धतीने लागवड करण्यास मदत होते तसेच आधुनिक व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाची पाहणी करून या पद्धतीची माहिती जाणून घेतली.सदर प्रात्यक्षिक तालुका कृषी अधिकारी, सिरोंचा श्री. चेतन पाणबुडे, उपकृषी अधिकारी, सिरोंचा-१ श्री. एस. एस. शिंगणे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गौरव खेर्डेकर तसेच समूह सहायक श्री. अनुज शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने इतर शेतकऱ्यांनीही पट्टा पद्धतीचा अवलंब करून धान उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.







