प्रतिनिधी / सागर मूलकला, सिरोंचा
सिरोंचा : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून गौतमी डिजिटलचे संचालक शिवकुमार मारगोनी व त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तर ५० हून अधिक लहान मुलांना वही-पेनचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.या उपक्रमातून जागतिक छायाचित्रण दिनाला सामाजिक कार्याची जोड देत गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपक्रमाला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी गौतमी डिजिटलचे संचालक शिवकुमार मारगोनी यांच्यासह महेश तोटा, महेश रल्लाबंडी, सुरज रंगुवार, संतोष डोंगरे, पोचना बोडेंकी, गंगाधर कंबगोनी, सुजल कम्मलवार, संजय येलम, साई पुल्ले, राजशेखर पासुला, नितीन कुम्मारी, तिरू करपेत, नरसिंह अल्लापू, चरण बोडेंकी आणि लक्ष्मण पासुला आदी मित्रमंडळी उपस्थित होते.यावेळी आयोजकांनी सामाजिक संदेश देताना, “काही लोक फक्त कॅमेऱ्याचे अँगल शोधतात; आणि आम्ही माणसांच्या चेहऱ्यावर हसू व आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतो,” असे सांगितले.जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून छायाचित्रणासोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.







