सागर मुलकला, प्रतिनिधी
| सिरोंचा तालुका : पेंटीपाका येथे अज्ञात व्यक्तीने दुचाकीला आग लावल्याची घटना २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास दुचाकीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लावण्यात आली आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.या घटनेमुळे पेंटीपाका परिसरात नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दुचाकीला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असून, तपासाअंतीच आग लावण्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.







