सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्याची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून प्रशंसा
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, निरीक्षक बोरकुटे तसेच जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यात आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, तसेच संघटन वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व उपस्थित मान्यवरांनी केले. *सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्याचे विशेष कौतुक* या मेळाव्यात विशेष उल्लेख सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्यपद्धतीचा करण्यात आला. सिरोंचा तालुक्यातील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून आंदोलने व पाठपुरावा केला आहे. गरीब, वंचित तसेच पीडित कुटुंबांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुलकला यांनी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सातत्याने लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज असून, सागर मुलकला यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन तळागाळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







