सागर मूलकला सिरोंचा, प्रतिनिधी
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी राहुल राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा सौ. पद्माताई सतीश बोगे, उपनगराध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक व स्वीकृत नगरसेवकांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी जगदीशभाऊ रल्लाबंडी, सतीशभाऊ बोगे, सतीशभाऊ राचर्लावार, नरेशभाऊ अलोने, राजेश बांदेला, पोचम अकुदरी, समय्या तोकला, मारुती गणपूरपु, संजू पेद्दपेल्ली, नागेश दुग्याला, भगवान पिल्ली तसेच युवा नेते कौशिकभाऊ बोगे उपस्थित होते. पाणीपुरवठा अभियंता धर्मेंद्र घोडे यांचीही उपस्थिती होती.सिरोंचा नगरपंचायतीला तब्बल अडीच वर्षांनंतर कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुख्याधिकारी राहुल राऊत यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय साधून शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यास तसेच विकासकामांना गती देण्यास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने सिरोंचा शहराच्या विकासाला आता नवी दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.







