सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे रुग्णांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला.अतुल गाण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गरजू व रुग्णांना मदतीचा हात देत वाढदिवसाचा आनंद सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कृष्णाकुमार चोक्कमवार, शहराध्यक्ष सलाम सय्यद, तालुका उपाध्यक्ष मनोज कुम्मरी, दलित आघाडीचे रमेश बाडसे, युवक अध्यक्ष अजय सोन्नारी यांच्यासह गुंपुला स्वामी, सुनील, राजू मूलकला, चिन्ना मूलकला, उदय मूलकला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यात आगामी काळातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.






