सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा तालुक्यात सामाजिक उपक्रमांची मालिका सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुत्तापूर गावात गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.अतुल गण्यारपवार यांचा वाढदिवस दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदाही सिरोंचा तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहेत.वाढदिवसानिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी दिली. यामध्ये गरजू नागरिकांना मदत, सामाजिक सेवा तसेच इतर लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.याच उपक्रमांतर्गत आज मुत्तापूर गावात गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता सामाजिक कार्यातून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, आगामी काळातही सिरोंचा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे सागर मूलकला यांनी सांगितले.







