*नगरसेवक नरेश अलोने यांच्या प्रयत्नांना यश; नगराध्यक्षा पद्मा सतीश भोगे यांच्या हस्ते भूमिपूजन
सागर मूलकला सिरोंचा प्रतिनिधी
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये सी.सी. नाली बांधकामासाठी १० लाख रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, आज या कामाचे भूमिपूजन *नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश भोगे यांच्या* हस्ते करण्यात आले.नगरसेवक नरेश अलोने यांच्या प्रयत्नातून सदर कामाला मंजुरी मिळाली आहे. हे काम ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना’ सन २०२५-२६ अंतर्गत करण्यात येणार असून, कामाची अंदाजित किंमत १० लाख रुपये आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनय्या जनगम, शहराध्यक्ष रवी सुलतान, नगरसेवक सतीश भोगे यांच्यासह प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन नाली बांधकामाचे काम मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी व सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.







