सिरोंचा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथे आयोजित दिनांक 18, 19,20 डिसेंबर 2025 या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम, सिरोंचा येथील विद्यार्थिनी कुमारी माधुरी आत्राम माध्यमिक आदिवासी गटातून तयार केलेल्या प्रतिकृती *टाकाऊ पदार्थ पासून शेणखत निर्माण करणे* यावर आधारित प्रतिकृती ने तृतीय क्रमांक प्राप्त झाले, त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षिका कुमारी. स्नेहा वैरागडवार यांनी केलेले सहकार्य आणि दिलेला आत्मविश्वास यामुळेच मला स्पर्धेत सहभागी होण्याचं साहस प्राप्त झाले असे विद्यार्थिनी ने सांगितले. तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक के बी जवाजी , शिक्षक आणि सर्व कर्मचारी यांनी विज्ञान शिक्षिका व विद्यार्थिनी चे अभिनंदन केले.







