सिरोंचा :-तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने राष्ट्र संत थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती व सामाजिक समता यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केले. “विचारात चालणारा समाजच खरा प्रगत समाज असतो” हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ जयंती-पुण्यतिथी साजरी न करता, संत गाडगेबाबा यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे मत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, सागर मुलकला यांनी या वेळी व्यक्त केली आहे, आजच्या काळात पत्रकारांनी सामाजिक भावना जपत ,सत्य, प्रामाणिकपणा आणि लोकजागृतीच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांच्या विचारांची पुढे नेणे आवश्यक आहे. समाजातील अस्वच्छता, अज्ञान व अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांच्या विचारात चालण्याचा संकल्प यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली, या कार्यक्रमास पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्याम बेज्जनवार,सचिव अशोक कुम्मरी, सागर मुलकला ,मुरली मारगोनी, साईनाथ दुर्गम, संतोष ,सुधाकर सिडाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.







