सागर मूलकला, संपादक
सिरोंचा :६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिरोंचा तालुक्यातील लोकमत वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार नागभूषण चकिनारपु यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी सिरोंचा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडत पत्रकारितेचे काम प्रामाणिकपणे केले आहे.पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी देणे नव्हे तर समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे माध्यम असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नागभूषण चकिनारपु यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी पोहोचवून अनेक समस्यांचे निराकरण घडवून आणले आहे.या सत्कार प्रसंगी बोलताना श्री. चकिनारपु यांनी, “पत्रकारांनी सत्य, निर्भीड आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. यावेळी नायब तहसीलदार मसराम यांच्यासह,विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कूम्मरी, श्याम बेज्जानवार, रवी सल्लम, रविकुमार येमुर्ला, सुधाकर सिडाम, रंगू देवेंद्र, महेश आगुला, वेंकटस्वामी चाकिनाला,चंद्रू पुलगम,रमेश सुव्वा, तिरुपती चिट्याला, अमित त्रिपटी,सुरेश त्रिपटी,आदी पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







