सागर मूलकला, मुख्य संपादक सिरोंचा |
नसीरखानपल्ली गावाजवळील शेतशिवारात एका ६५ वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मृत व्यक्तीचे नाव शंकर सिडाम (वय ६५), रा. देचिलपेठा ता. सिरोंचा असे असून, त्यांची ओळख नातेवाईकांनी केली आहे. सदर मृतदेह आढळताच ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल फटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, तसेच पोलीस अंमलदार पोरेड्डीवार करीत आहेत. घटनास्थळी पोलीस पाटील श्रीनिवास पार्शबोइना, तसेच चंद्रमौली दगाम, कोतवाल प्रशांत चेन्नूरी, शंकर कुरसांगे , गावकरी यांची उपस्थिती होती.या घटनेमुळे परिसरात एकाच खडबळ उडाली यांची पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.







