सिरोंचा : तालुका आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविका रिक्त पदांसाठी उद्या बुधवारी दिनांक १२/मार्च रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत कोणत्याही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ नये, पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी केली आहे.
यासंदर्भात आज सागर मूलकला यांनी पत्रकार परिषद घेतली जाणार असून सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे, कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जर भरती प्रक्रियेत कोणत्याही उमेदवारावर अन्याय झाल्याचे आढळून आले, तर त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील सागर मूलकला यांनी दिला आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेबाबत नागरिक व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेत आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेबाबत सविस्तर भूमिका मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे,







