सागर मूलकला / संपादक
सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथे युवा स्टार सी.सी.च्या वतीने आयोजित ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकरजी कोल्लूरी तसेच शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ३१,००० रुपये मा. हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक २१,००० रुपये राष्ट्रवादी काँग्रेस नेते बनय्या जनगम तसेच बामणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुळसंगे साहेब यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर तृतीय पारितोषिक ११,००० रुपये ग्रामपंचायत सदस्य पोचन्ना दुर्गम यांच्या वतीने देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष म्हणून बामणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुळसंगे साहेब उपस्थित होते. यावेळी गर्कापेठा ग्रामपंचायतीचे सरपंच सूरज गावडे, उपसरपंच व्यंकटी दासरी, बामणी/वेंकटपूरचे सरपंच अजय आत्राम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पडलावार, रवी करसपल्ली, अशोक मडावी, तिरुपती जोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.







