संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : सिरोंचा–धर्मापुरी मार्गावर प्रणहिता हॉटेल समोर आज ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. तेलंगणाहून सिरोंचा कडे येत असलेल्या ट्रकसमोर अचानक एक दुचाकी वाहन आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला धडक लागू नये म्हणून ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. मात्र नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमी चालकाला सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







