सिरोंचा | प्रतिनिधी : सागर मूलकला
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सिरोंचा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारांतर्गत बसस्थानक परिसरात आज वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास सिरोंचा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश भोगे, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक नरेश अलोणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपूरापू, संजू पेद्दापल्ली, भगवान पिल्लीवार, संदीप गंजीवार, माजी वाहतूक नियंत्रक सय्यद अकबर, वाहतूक नियंत्रक सूर्यकांत मोरे, तसेच अहेरी आगाराचे बसस्थानक प्रमुख अतुल रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अहेरी आगारातील चालक-वाहक महादेव कोळपे, बांधुरकर, बिरबल मडावी, प्रफुल कन्नाके, विशाल येनमवार, सुरेश उईके यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सफाई कर्मचारी रफिक शेख, सुनील, आशा मा यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण, हरित परिसराची निर्मिती आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमास बसस्थानकातील कर्मचारी, नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे वृक्षारोपणाचा हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.






