सिरोंचा | प्रतिनिधी, सागर मूलकला
सिरोंचा नगर पंचायतचे नवनियुक्त मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सिडाम साहेब यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यानिमित्ताने नगर पंचायतच्या नगराध्यक्षा पद्माताई बोगे यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा पद्माताई बोगे यांनी सिडाम साहेब यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळात सिरोंचा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या व पारदर्शक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.या स्वागत समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रवी सुलतान, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक नरेश अलोने, नगरसेवक इम्तियाज खान, मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष समय्या तोकला, सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपूरापू, सामाजिक कार्यकर्ते संजू पेद्दापल्ली, सामाजिक कार्यकर्ते पोचम आकुदारी, भगवान पिल्लीवार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी नवनियुक्त मुख्याधिकारी सिडाम साहेब यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.







