सागर मूलकला / सिरोंचा
सिरोंचा, दि. ३ जुलै : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बरसागडे यांच्या सूचनेनुसार सिरोंचा येथे भाजपची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली.जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाऊ नरहरी आणि तालुकाध्यक्ष श्रीनाथभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत संघटन बळकटीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः SIR दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.यावेळी आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणी, मतदानाचे महत्त्व तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर सक्रिय राहून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले.बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन कलाक्षपवार, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष संपत दाया, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री शारीख शेख, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र रंगूवार, तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्माकारी, जिल्हा सोशल मीडिया प्रतिनिधी श्याम बेज्जनी, तालुका सोशल मीडिया प्रमुख नागेश ताडबोईना, राजेश रंगूवार, गगन पोलमपल्ली, संतोष सिडाम, रवी दुर्गम, आनंद रच्चावर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.







