सिरोंचा | रामंजापूर येथील आशा स्वयंसेविका माधवी यांच्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्याचे आयोजन सिरोंचा येथील श्री राजराजेश्वरी फॅशन हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या आनंददायी सोहळ्यास सिरोंचा नगर पंचायतीचे नगरसेवक सतीश बोगे यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा व उज्ज्वल वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रवी सुलतान, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, ज्येष्ठ नागरिक राजन्ना तोटा, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जुगुणू भाई तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पाडला यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमात नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवदाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या. संपूर्ण सोहळा आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.







