सिरोंचा | प्रतिनिधी , सागर मूलकला
सिरोंचा येथील श्री राजराजेश्वरी फॅशन हॉल येथे परसा आकाश यांच्या विवाह सोहळ्याचा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी सिरोंचा नगरपंचायतीचे नगरसेवक सतीश बोगे यांनी उपस्थित राहून नवविवाहित वधू-वरांना शुभ आशीर्वाद देत त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या विवाह सोहळ्यास नगरसेवक नरेश अलोने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी सुलतान, व्यापार संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यास सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत विवाह सोहळ्याला मंगलमय वातावरण लाभल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले असून, संपूर्ण सोहळा आनंदोत्सवात पार पडला.







