सागर मूलकला , सिरोंचा
सिरोंचा, दि. 09 जुलै 2026ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाचनालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन नगरपंचायत सिरोंचा यांच्या वतीने *नगराध्यक्षा सौ. पदमा सतीश भोगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले*. फित कापून व नारळ अर्पण करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. राजू सिडाम, नगरसेवक सतीश भोगे,रंजित गागापुरवार , सतीश राचर्लावार,जगदीश रालबांडीवर नरेश अलोणे, इम्तियाज खान, नगरसेविका पदमा पिल्लीवार, पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, माजी नगरसेवक विजय तोकला, सामाजिक कार्यकर्ते मारोती गनपुरपु , पोचम आकुदारी, इझहार शेख, भगवान पिल्लीवार, नगरपंचायत अभियंता धर्मेंद्र घोडे, कर्मचारी सत्यना डुरके, कंत्राटदार राहुल जिठ्ठाबोईना तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम खासदार निधीतून मंजूर झालेल्या ₹15 लाखांच्या निधीतून करण्यात येणार असून, सिरोंचा–सूर्यरावपल्ली मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे नगरपंचायतीच्या जागेवर उभारले जाणार आहे.







