सागर मूलकला, संपादक
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील रायगुडम येथील इंद्रावती नदी परिसरात तेंदूपत्ता पडीवर काम करणाऱ्या मजुरांवर गुरुवारी सायंकाळी अचानक वीज कोसळल्याने एक मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर भोपालपटनम व बीजापूर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.मृत व जखमी मजूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर ठेकेदाराकडून मजुरांसाठी सुरक्षित निवास व संरक्षणाची व्यवस्था नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्थानिक आदिवासी मजुरांना काम न देता बाहेरील मजूर आणल्याने परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.







