सिरोंचा : वडदाम गावातील नागरिक शंकर गोसुला यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असल्याची माहिती गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार डॉ राजे धर्मराव बाबा यांच्यापर्यंत पोहोचविली.
ही बाब लक्षात घेत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी तत्काळ पुढाकार घेत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यांच्या या मदतीमुळे गोसुला कुटुंबाला मोठा आधार मिळाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी वडदाम मच्छीमार संस्थाचे अध्यक्ष बट्टी मल्लेश, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र अडपा तसेच कार्यकर्ते नागेश आल्लुरी आणि जक्कुलू गग्गुरी उपस्थित होते.







