सिरोंचा तालुक्यातील तालुका आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा, रंगयापल्ली,टेकडा ताला, मोयाबिनपेठा, आणि झिंगानूर निहाय एकूण १६ रिक्त पदे भरण्यास १४/१२/२०२५ रोजी जाहिरात काढण्यात आली आहे,
त्यामध्ये अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मुत्तापूर माल गावातील रिक्त असलेल्या आशा स्वयंसेविका पद वगळून मुत्तापूर चेक गावात रिक्त पद काढण्यात आली आहे,
मुत्तापूर माल येते गेल्या पद भरतीमध्ये रिक्त जागा होते, पण या भरतीत मात्र पद वगळण्यात आल्याने यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे,
तसेच गेल्या वेळी आशा स्वयंसेविका पद भरतीमध्ये सिरोंचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी पदे भरताना त्यांचे मनमानीने कमी गुण आणि कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना पात्र करून जास्त गुण आणि जास्त शिक्षण असलेल्या उमेदवारांना अपात्र केला होता, ही प्रकरण समोर आल्याने त्यावेळी सिरोंचा तहसील कार्यालय मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आली होती,
त्यावेळी DHO यांनी आशा स्वयंसेविका पद भरती घोटाळा असल्याचे स्पष्ट झाल्याने आशा स्वयंसेविका पदभरती प्रक्रिया रद्द केली आहे,
आणि काही महिन्यात या डिसेंबर मध्ये पुन्हा:चा नव्याने आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात देखील काढण्यात आली असून या पदभरती प्रक्रिया तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते ना घेता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा समिती मार्फत आणि CC TV कॅमेरेच्या नजरेत उमेदवारांची मुलखातीत घेण्यात यावी, तसेच शौक्षणिक, स्थानिक,अनुभव, मुलाखत आणि इतर प्राधान्य गुणवत्ता यादी प्रसिद्धी करावी,
पुन्हा एकदा पात्र उमेदवाराना अन्याय होऊ नये यांची दक्षता घ्यावी, अन्यथा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचा वतीने आंदोलना शिवाय पर्याय नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी तहसील कार्यालयामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आली आहे,







