सिरोंचा तालुक्यातील राजीवनगर गावात नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) कोल्हे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नवीन अंगणवाडी इमारतीमुळे लहान मुलांचे पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण व मातांसाठी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे आमदार आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाच्या बालकल्याणकारी योजनांचा आढावा घेत ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.तसेच राजीवनगर गावाच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी गावातील महिला व नागरिकांनी नवीन अंगणवाडी इमारतीबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहे,







