सिरोंचा, ता – ६ जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सिरोंचा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व कार्यरत पत्रकारांचा सन्मान सोहळा, पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत तहसीलदारांना निवेदन, तसेच बस स्टँड चौकात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बस स्टँड चौकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाला उजाळा दिला.यानंतर आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात समाजासाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार नायब तहसीलदार मसराम आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य व निर्भीड लेखनाची जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पत्रकार संरक्षण कायदा, शासकीय योजनांचा लाभ, आरोग्य विमा, अधिस्वीकृती व अन्य मूलभूत सुविधा, यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कूम्मरी, ज्येष्ठ पत्रकार नागभूषण चाकीनारापू, रवी सल्लम, तिरुपती चिट्याला, अमित त्रिपटी, सुरेश त्रिपटी, श्याम बेज्जनवर , रविकुमार येमुर्ला,रंगू देवेंद्र,महेश आगुला, वेंकटस्वामी चाकिनाला,चंद्रू पुलगम, रमेश सुव्वा,छोटू खान, राजू गंदाम,सय्यद अफरोज,विनोद नायडू, संतोष चंदावार आदी सर्व पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,







