सिरोंचा :- समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील अनेक शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या आहेत. यात सिरोंचातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे विद्यार्थीनींना संगणकाचे धडे दिले जात आहेत. संगणक प्रोजेक्टर व इंटरनेट सारख्या साधनांचा वापर करून शिक्षक विविध विषय अधिक आकर्षक व समजण्यास सुलभ पध्दतीने शिकवित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनीची अभ्यासविषयी आवड वाढत आहे. आयसीटी लॅबमुळे विद्यार्थीनींना संगणक हाताळण्याची सवय लागून त्यांच्यात डिजिटल कौशल्य व आत्मविश्वास वाढत आहे. या उपक्रमात आयसीटी शिक्षिका रविना दुरशेट्टी यांचे मोलाचे योगदान असून यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हा समन्वयक अविनाश सयाम यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला लॅबच्या अधिक प्रभावी वापर करता आला आहे.मुख्याध्यापिका कु. मनीषा साखरे यांनी सांगितले की, आयसीटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची संधी मिळत आहे. शिक्षक आयसीटीचा उपयोग करून धळे अधिक प्रभावी करत असल्याने शिक्षण प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. शाळा व्यवस्थापक शिक्षक, आयसीटी शिक्षक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक व समग्र शिक्षण अभियान यांचा संयुक्त आपली लॅब यशस्वीरित्या सुरू आहे अशी माहिती मुख्याध्यापिका कु. मनीषा साखरे यांनी दिली.







