सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथील बस स्थानक परिसरात ग्रामपंचायत आसरअल्लीच्या वतीने मोफत पाणपोयीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी व ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत आसरअल्लीचे सरपंच (प्रशासक) रमेश तैनेनी, ग्रामपंचायत अधिकारी विलास चोप्पावार, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता तैनेनी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अत्यंत उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.







