सागर मूलकला/ सिरोंचा
*सिरोंचा, दि. २९ मार्च २०२६ – सिरोंचा–धर्मापुरी मार्गावर २९ मार्च रोजी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात *राजाराम अरिगेला ( रा.नगरम)* यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असताना *राजे अंब्रीशराव महाराज* यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला.महाराजांच्या वतीने आज अरिगेला कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले व कुटुंबाच्या तातडीच्या आवश्यक गरंजाकरिता आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी महाराजांचे आभार मानले.या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष *शंकर नरहरी*, तालुका अध्यक्ष *श्रीनाथ राऊत*, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष *शाहरुख पठाण*, तालुका उपाध्यक्ष *चंद्रन्ना सदनपू*, तालुका महामंत्री *रमेश मुंगीवार*, तालुका सोशल मीडिया प्रमुख *नागेश ताडबोईना* *राजेश रंगूवार* भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता उपस्थित होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.







