सिरोंचा तालुक्यातील पेंटींपाका गावचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्री गादे सोमन्ना यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. ते दीर्घकाळ गावाच्या विकासासाठी झोकून देऊन कार्यरत होते.गोरगरीबांच्या सुखदुःखात सदैव धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामांना गती मिळाली होती. त्यांच्या साध्या व नम्र स्वभावामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावातील नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.







