सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतमध्ये सध्या गाजत असलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाचे गडचिरोलीचे माजी जिल्हा अध्यक्ष शंकरजी बोरकुट हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत नगर पंचायतमधील राजकीय घडामोडी, अविश्वास प्रस्तावामागील भूमिका तसेच पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.ही पत्रकार परिषद उद्या दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी 12:00 वाजता सिरोंचा येथील विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित विषयावर महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने या परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, सर्व पत्रकार बांधवांनी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







