सागर मूलकला / संपादक
सिरोंचा पत्रकार संघटनेचे उद्या दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील विश्राम गृह, सिरोंचा येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित समस्या, कामकाजातील अडचणी तसेच पत्रकारांच्या हक्कांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणी या महत्त्वाच्या विषयावरही विचारविनिमय होणार आहे.तसेच नवीन पत्रकार बांधवांना संघटनेत प्रवेश देण्याचा कार्यक्रमही यावेळी पार पडणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, पोर्टल मीडिया तसेच इतर पत्रकार बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघटना, तालुका सिरोंचा चे अध्यक्ष सागर मूलकला व सचिव अशोक कुम्मरी यांनी केले आहे.बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेला बळकटी द्यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.







